अंतर योग फाउंडेशन
आपल्या भारत देशाच्या आमूलाग्र परिवर्तनाचं नेतृत्त्व
आचार्य उपेंद्रजींची ऐतिहासिक राष्ट्रीय यात्रा - भारताच्या क्रांतिकारी परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल
देशातील महान संत आणि विविध आध्यात्मिक संस्थांचे नेते आचार्य उपेंद्रजींच्या दिव्य शक्तीचे कौतुक करतात आणि त्यांना आपला पूर्ण पाठिंबा व आशीर्वाद देतात.
महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी जी महाराज
माजी अध्यक्ष, हिंदू धर्म आचार्य सभा, हरिद्वार
अध्यक्ष, सिद्ध पीठ सुरतगिरी बांगला, हरिद्वार
अध्यक्ष, सन्यास आश्रम, मुंबई
स्वामी निखिलानंद जी
माजी अध्यक्ष, चिन्मय मिशन, दिल्ली
८ वे चोकयोंग पाळगा रिनपोछे
लडाख
श्री श्री अभिनव
शंकर भारती महास्वामी दक्षिणमनय श्री शारदा पीठ कुडाळी, कर्नाटक
सर्व प्रमुख आध्यात्मिक संस्थांना आणि देशातील प्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या प्रमुखांना एका माळेत मोत्यांसारखे गुंफत, आचार्य उपेंद्रजी निःस्वार्थी भावनेने आणि समर्पणाने भारताला विश्वगुरु बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत आहेत.
श्री शंकर अभ्यंकर
संस्थापक, आदित्य प्रतिष्ठान
स्वामी आत्मप्रियानंद जी महाराज
कुलगुरू, रामकृष्ण मिशन, विवेकानंद विद्यापीठ, कोलकाता
सुनील महाराज
अध्यक्ष, रामकृष्ण मिशन, नागपूर
आचार्य उपेंद्रजी आध्यात्मिक नेत्यांशी संवाद साधत आहेत, भारतदेशा समोरील आव्हाने समजून घेत आहेत आणि त्यावर उपाय शोधण्याच्या दिशेने चर्चा करत आहेत.
भारताच्या आध्यात्मिक गुरूंशी आध्यात्मिक संमेलन
आचार्य उपेंद्रजी देशभरातील व्यापक यात्रांद्वारे देशातील आध्यात्मिक नेत्यांना एकत्र आणत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट सनातन धर्माचे पुनरुज्जीवन करणे आणि भारताला विश्वगुरु म्हणून पुनर्स्थापित करणे आहे
स्वामी सुखबोधनंद जी महाराज
संस्थापक, प्रसन्ना ट्रस्ट, बंगळुरू
स्वामी सत्यदेवानंद जी महाराज
अध्यक्ष, रामकृष्ण मिशन, मुंबई (खार)
स्वामी देवकीनंदन ठाकुर जी महाराज
संस्थापक, विश्वशांती चॅरिटबल ट्रस्ट
स्वामी चिदानंद सरस्वतीजी महाराज
अध्यक्ष, परमार्थ निकेतन आश्रम, ऋषिकेश
स्वामी अनुभवानंदजी महाराज
संस्थापक, सद्भावना ट्रस्ट
श्री ओ. पी. तिवारी जी
अध्यक्ष, कैवल्यधाम समिती, लोणावळा
आचार्य उपेंद्रजींच्या उदात्त दृष्टिकोनाचा आणि त्यांच्या अविरत समर्पणाचा आदर करून, अनेक आध्यात्मिक गुरूंनी त्यांच्या या अभूतपूर्व कार्याला आशीर्वाद दिला आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.
डावीकडून उजवीकडे:
आदरणीय रूपा ताई, गुरुमाता रुचिरा मोडकजी (स्वामी शिवकृपानंदजींच्या धर्मपत्नी), आचार्य उपेंद्रजी आणि गुरुमाता नीता ताई
स्वामी शिवकृपानंदजी महाराज
संस्थापक, समर्पण मेडिटेशन, नवसारी, गुजरात
आचार्य उपेंद्रजींची श्री सुधीर मुनगंटीवार (महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री) आणि
डॉ. चिन्मय पंड्या (प्र-कुलगुरू, देवसंस्कृती विद्यापीठ) यांच्यासोबत चर्चा करताना
श्री हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज (संस्थापक, राधा केली कुंज, वृंदावन) यांच्यासोबत देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करताना
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आचार्य उपेंद्रजींसोबत
आचार्यजी विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तिमत्त्वांसोबत भारताला प्रभावित करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करतात
श्री नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
श्री सुनील देवधर
भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी आणि माजी राष्ट्रीय सचिव, भारतीय जनता पक्ष
श्री प्रकाश आंबेडकर
अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
प्रांजल जाधव
राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार
महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री
पंकज रैना
डबिंग दिग्दर्शक आणि अभिनेता
सौगात भट्टाचार्य
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक, भारत उद्योग गौरव
डॉ. सतीश पाठक
सहाय्यक संचालक, कैवल्यधाम
सुहिता थत्ते
भारतीय दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेत्री
शार्दूल ठाकूर
भारतीय क्रिकेटपटू
भारताला निरोगी, समृद्ध आणि जागतिक नेतृत्वकर्ता बनवण्याचा आराखडा मांडण्यासाठी माध्यम परिषद
महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ यांसारख्या प्रतिष्ठित प्रकाशनांनी आचार्य उपेंद्रजींच्या परिवर्तनशील कार्याची, उपक्रमांची आणि कार्यक्रमांची प्रशंसा केली आहे.
अंतर योग फाउंडेशनच्या दृष्टिकोनाबद्दल वाढत्या माध्यमीय उत्सुकतेला प्रतिसाद म्हणून, आचार्यजी नियमितपणे माध्यम परिषदा आयोजित करतात
माध्यम प्रदर्शन कक्ष
विविध माध्यम वाहिन्याद्वारे आणि प्रसारण वाहिन्याद्वारे आचार्य उपेंद्रजींच्या महत्त्वपूर्ण योगदानाची नियमितपणे दखल घेतली जात आहे
राष्ट्रासाठी शक्तिशाली जागृतीचा संदेश
आचार्य उपेंद्रजींनी लाखो लोकांसमोर एक शक्तिशाली संदेश दिला, ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक पैलू आध्यात्मिकतेच्या आधारावर परिवर्तित करण्याचे महत्त्व समजावले आहे.
त्यांनी देशवासियांना आत्मज्ञाना साठी आणि सामूहिक प्रगतीसाठी प्रेरित केले आहे
आचार्य उपेंद्रजींना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यासाठी संपर्क साधा:
भारताच्या कुंडलिनी शक्तीची जागृती
आचार्य उपेंद्रजी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करतात. यामध्ये पूजा, यज्ञ आणि जीवन परिवर्तन घडवणारी ज्ञानसत्रे यांचा समावेश असतो. विशेषतः ऐतिहासिक मंदिरांमध्ये आणि पवित्र तीर्थक्षेत्रांवर हे कार्यक्रम होतात
भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी दिव्य यज्ञ
आचार्य उपेंद्रजी आणि गुरुमाता नीता ताई यांनी सनातन धर्माची स्थापना आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी सावित्री कथक अग्निचयन महायज्ञाचे आयोजन केले
मंत्रोच्चारण, यज्ञ, मार्जन आणि तर्पण यांचा उपयोग करून देशातील नागरिकांचे भविष्य बदलण्यासाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात.
नित्य आणि साप्ताहिक सेवा उपलब्ध:
नवग्रह आणि इतर शक्तिशाली देवतांच्या पूजा, मंत्रोच्चारण, यज्ञ आणि अभिषेक यांच्या माध्यमातून आपण समृद्ध, ज्ञानी आणि आरोग्यदायी बना.
सेवा आरक्षित करण्यासाठी संपर्क साधा:
+९१ ७७१०९ ४८४६१
महालय अमावास्येला सामूहिक श्राद्ध - भारतातील नागरिकांना पितृ दोषापासून मुक्त करण्यासाठी
जोपर्यंत आपल्या देशातील नागरिकांचा पितृ दोष दूर होत नाही, तोपर्यंत आपला देश आरोग्यवान, समृद्ध किंवा जागतिक आध्यात्मिक नेता होऊ शकत नाही.
या विचाराने प्रेरित होऊन, आचार्य उपेंद्रजी पारंपरिक पद्धतींनी सामूहिक श्राद्ध विधी आयोजित करतात आणि ध्यान, आध्यात्मिक साधना आणि संकल्प यांच्या माध्यमातून पितृ दोष दूर करण्यास मदत करतात.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आध्यात्मिक शिबिरे
गुरुमाता नीता ताई मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक शिबिरे आयोजित करतात. ही मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या शिबिरांमध्ये शेकडो मुले नियमित सहभागी होतात.
आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना या समृद्ध आध्यात्मिक शिबिरांमध्ये सहभागी करून घ्या.
त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अद्वितीय संधी द्या.
आजच संपर्क साधा:
+९१ ७७१०९ ४८४६१
गुरुमाता नीता ताई यांच्या मार्गदर्शनाखाली मुले सामर्थ्यवान ध्यान आणि यज्ञ करीत आहेत.
देशभरात समग्र उपचारासाठी सायन्स ऑफ हीलिंग कार्यशाळा
अंतर योगची अद्वितीय ‘सायन्स ऑफ हीलिंग’ कार्यशाळा आपली अंतर्गत उपचारशक्ती जागृत करते. ही कार्यशाळा दुर्लभ व दिव्य शक्तिपात साधना आणि प्राचीन योगिक उपचार पद्धतींचे पुनरुज्जीवन करते.
जगभरातील लोकांनां आलेले विलक्षण वैद्यकीय लाभ जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या.
भारताच्या नागरिकांचे भविष्य नव्याने घडवणे
आचार्यजी अंतर योग नाडी ज्योतिषद्वारे शुद्धीकरण उपाय करतात. हे उपाय साधकांचे कर्म शुद्ध करून त्यांच्या भविष्याला नव्याने आकार देतात.
आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी अचूक भविष्यवाणी आणि प्रभावी उपाय मिळवा.
अंतर योग नाडी ज्योतिष केंद्राशी संपर्क साधा आणि आपली नाडी वाचन वेळ निश्चित करा:
+९१ ९१३६९ ६३८२१ / +९१ ९१३६१ ६४८२०
जागतिक शांती आणि समृद्धीसाठी शुभ अभिषेक
आचार्यजी आणि गुरुमाता नीता ताई नियमितपणे विविध देवतांवर अभिषेक करतात, ज्यामुळे जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती होते.
जगभरातील हजारो साधक या पवित्र आणि शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.
प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य
‘जनहिताय स्वयं मोक्षाय च’ (सर्वांच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या मुक्तीसाठी) या तत्त्वाला आत्मसात करून, अंतर योगमध्ये प्रत्येक व्यक्तीला पवित्र कर्म, विधी, समारंभ आणि सेवाभाव यामध्ये भेदभाव न करता सहभागी होण्याची संधी दिली जाते.
प्रत्येक अडथळ्यावर मात करून अंतिम यश मिळवण्यासाठी: गणेश पूजा, अभिषेक, यज्ञ, ज्ञान जागृती आणि साधना सत्रांमध्ये सहभागी व्हा, जे दर महिन्याला आदरणीय आचार्य उपेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आयोजित केले जातात.
सामील होण्यासाठी संपर्क साधा: +९१ ७७१०९ ४८५६१
जीवन परिवर्तन घडवणारी शिबिरे आणि कार्यशाळा
आचार्य उपेंद्रजी ब्राह्मणांना वेदांचे ज्ञान प्रसार करण्यासाठी आणि या मूल्यांना आपल्या देशातील लोकांमध्ये रुजवण्यासाठी मार्गदर्शन करतात.
आचार्यजी नियमितपणे आध्यात्मिक ज्ञानसत्रे आयोजित करतात, ज्यामध्ये आपल्या शास्त्रांनुसार देवतांची योग्य पूजा करण्याचे मार्ग स्पष्ट केले जातात. यामधून लोकांमधील धार्मिक गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
आगामी शिबिरे, कार्यक्रम आणि अन्य महत्त्वाच्या घोषणांची माहिती मिळवण्यासाठी
अंतर योग टेलिग्राम वाहिनीमध्ये सामील व्हा :
आचार्य उपेंद्रजी विविध शिबिरे आयोजित करतात, ज्यामध्ये प्राचीन ग्रंथांचे सखोल ज्ञान शिकवले जाते. अशी शिबिरे व्यक्तींना आनंद, यश आणि मोक्षाकडे जाण्याचं मार्गदर्शन करतात
आचार्य उपेंद्रजींचे परिवर्तन घडवणारे शिबिर आणि कार्यशाळा आपल्या शहरात, शैक्षणिक संस्थेत किंवा उद्योग क्षेत्रातील कार्यक्रमात आयोजित करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा :
आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यशाळा
आचार्य उपेंद्रजी आणि गुरुमाता नीता ताई आपल्या देशाच्या नागरिकांना आधुनिक काळातील उत्पन्नाच्या विविध स्रोतांबद्दल ज्ञान देतात
यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते.
आचार्य उपेंद्रजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली प्रगत श्रीविद्या सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधनेची दुर्लभ दीक्षा
या प्रगत आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून, हजारो भारतीय आज यश, संपत्ती, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट अनुभवत आहेत.
योगासन, प्राणायाम आणि साधना - आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी
गुरुमाता नीता ताई योग आणि प्राणायाम सत्रांचे नेतृत्व करतात. याद्वारे भारतातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे हा उद्देश्य आहे. देशभरातून हजारो लोक नियमितपणे या सत्रांमध्ये सहभागी होतात.
आध्यात्मिक यात्रा :
अंतर्मनाचा शोध घेणारी एक आत्मिक यात्रा
आदरणीय रूपा ताई अंतर योग यात्रेदरम्यान मंदिरांना ऊर्जावान करण्यासाठी सामूहिक साधना सत्रांचे नेतृत्व करतात.
अंतर योगद्वारे आयोजित विविध आध्यात्मिक यात्रांमध्ये सहभागी व्हा.
संपर्क: +९१ ७७१०९ ४८४६१
या प्रवासाचा अनुभव घ्या, जो तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करेल आणि तुमच्या अंतःकरणाशी अधिक सखोल नाते निर्माण करेल.
निर्जनवास :
आध्यात्मिक पुनरुज्जीवनासाठी एक आनंददायी विश्रांती
साधकांना जीवन जगण्याचे सार आचार्यजी विविध खेळ आणि उपक्रमांद्वारे शिकवतात
साधकांचा उत्साह पुनः जागृत करण्यासाठी आणि त्यांना गहन आंतरिक शांतता प्रदान करण्यासाठी, रूपा ताईंच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली अनेक चैतन्यशील कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये मुख्यतः ज्ञानसत्रे आणि ध्यानसत्रे असतात, ज्यामध्ये आचार्य उपेंद्रजी प्रमुख आकर्षण म्हणून साधकांना आध्यात्मिक जागृती आणि परिवर्तन यासाठी मार्गदर्शन करतात.
तुमच्या रोजच्या जीवनातील एक अल्पविराम घ्या आणि स्वतःला पुन्हा उर्जित करा.
अंतर योग निर्जनवासमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधा: +९१ ९३७२२ २९६०७
खेळांच्या माध्यमातून वेदांताचे श्रेष्ठ ज्ञान शिकवणे
अंतर योग द्वारा नियमितपणे क्रीडा दिनाचे आयोजन केले जाते. ह्यातील अनोखे खेळ तरुणांना प्रेरित करतात आणि तीन पिढ्यांना एकत्र येण्याची संधी निर्माण करतात. यात एकमेकांच्या गुण व कौशल्य यांचा आदर केला जातो आणि कमतरतांवर मात केली जाते.
अंतर योग महादान - अपरिमित प्रमाणात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दान
अंतर योग समाजातील विविध घटकांना त्यांची गरज भागवण्यासाठी उच्च दर्जाच्या वस्तू भरपूर प्रमाणात पुरवतो.
आजारी व्यक्तींसाठी दान
आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योगचे साधक रुग्णालयांच्या भेटी दरम्यान रुग्णांना दिलासा देऊन सस्नेह औषधे, फळे आणि इतर आवश्यक वस्तू समर्पक प्रमाणात भेट देतात.
महिला सक्षमीकरण
गुरुमाता नीता ताई हजारो महिलांना वेदांत शिकून आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा देतात.
गरजूंची सेवा
अंतर योग द्वारा अनेक ग्रामीण भागांमध्ये लाखो किलो अत्यावश्यक किराणा सामानाचे गरजूंना वाटप केले जाते तसेच त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
दिव्यांग व्यक्तींची सेवा
आचार्य उपेंद्रजी दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देतात आणि साधकांना सहानुभूतीची शिकवण देतात.
तुमच्या छोट्याशा योगदानाने मोठा बदल घडू शकतो.
अंतर योग महादान प्रकल्पात योगदान देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा :-
+९१ ७७१०९ ४८४६१
बालसेवा
आदरणीय रूपा ताई आणि अंतर योगचे साधक विविध शहरांमधील अनाथालये आणि बालकेंद्रांना भेट देऊन असीम प्रेम आणि करुणेने हजारो मुलांना शालेय साहित्य दान करतात.
आचार्य उपेंद्रजी, गुरुमाता नीता ताई आणि आदरणीय रूपा ताई अंतर योग महादान प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करतात, ज्यामुळे मुलांचे जीवन आनंदी होते.
ज्येष्ठ नागरिकांची सेवा
आचार्य उपेंद्रजी, गुरुमाता नीता ताई आणि अंतर योगचे साधक नियमितपणे वृद्धाश्रमांना भेट देतात आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतात.
ते या ज्येष्ठांना आपल्या आई-वडिलांप्रमाणे प्रेम आणि काळजी देतात आणि त्यांचा जीवनाविषयीचा उत्साह पुनर्जागृत करतात.
ब्राह्मण दान आणि ब्राह्मण भोजन
आचार्य उपेंद्रजी आणि गुरुमाता नीता ताई ब्राह्मणांना सन्मानाने अन्न, वस्त्रे, पूजा साहित्य आणि दक्षिणा नियमितपणे प्रदान करतात. हे ब्राह्मण समाजातील परंपरा, मूल्ये आणि नैतिक मानदंड जतन करण्याचे कार्य करतात.
महादान प्रकल्पाचा भाग म्हणून, अंतर योग द्वारा नियमितपणे ब्राह्मण दान आणि ब्राह्मण भोजन आयोजित केले जाते.
या उदात्त कार्याला आपले योगदान द्या आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा:
+९१ ७७१०९ ४८४६१
गौ सेवा
गौ सेवा (गाईंची सेवा) हा अंतर योग जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याला प्रत्येक साधक पूर्ण मनोभावाने स्वीकारतो.
आचार्यजी आणि गुरुमाता नीता ताई नियमितपणे शेकडो गायींची सेवा करतात, त्यांच्याप्रती आपले आभार आणि प्रेम व्यक्त करतात.
अंतर योग गुरुकुल
राष्ट्राच्या अद्वितीय परिवर्तनाचे केंद्र
गजबजलेल्या मुंबईच्या मध्यभागी वसलेले, अद्वितीय असे अंतर योग गुरुकुल एक प्रगाढ शांतीचा अनुभव देते
हे गुरुकुल आचार्य उपेंद्रजी, गुरुमाता नीता ताई आणि आदरणीय रूपा ताई यांच्या अनेक जन्मांच्या तपश्चर्येचे प्रतीक आहे.
आचार्य उपेंद्रजींच्या संकल्पासाठी समर्पित स्वयंसेवक
आचार्यजींच्या संकल्प पूर्ती च्या निकडीची जाणीव ठेवून, शेकडो अनुयायी गुरुकुलात निःस्वार्थ सेवा करण्यासाठी येतात आणि भारताला महासत्ता आणि विश्वगुरु बनवण्यासाठीच्या अभियानामध्ये योगदान देतात.
एक ज्ञानी गुरू आणि त्यांच्या संकल्पपूर्ती साठी निःस्वार्थ सेवा करणे हा तुमच्या कौशल्यांचा विकास, समाधान, मानसिक शांती, आनंद आणि दिव्य कृपा प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
अंतर योग गुरुकुलात स्वयंसेवा करण्याची करण्यासाठी संपर्क साधा:
+९१ ७७१०९ ४८४६१