आचार्य उपेंद्रजी - एक द्रष्टे नेते, भारताचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील
* अंतर योगचे संस्थापक आचार्य उपेंद्रजी यांनी सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था कैवल्य अवस्था प्राप्त केली आहे आणि ते जीवन मुक्त सद्गुरू आहेत.
* असीम ज्ञानाचे स्रोत.
* अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे साक्षात उदाहरण.
* २००५ पासून, भारताला विश्वगुरू आणि महाशक्ती बनवण्याच्या उदात्त ध्येयासाठी निःस्वार्थी आणि अहोरात्र कार्यरत.
* आध्यात्मिक गुरु आणि श्रीविद्या गुरु.
* निर्व्याज प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण.
* दिव्य तंत्रविद्यांचे गुरु, ज्यांनी अनेक प्रभावी साधना अनेक वर्षांच्या ध्यान आणि तपश्चर्येतून रचल्या आहेत.
* अनेक दुर्लभ सिद्धी आणि योगशक्ती प्राप्त केल्या आहेत, जसे की उपचारशक्ती, वाकसिद्धी (शब्द सत्यात उतरण्याची क्षमता), संकल्प सिद्धी, श्रीविद्या, आणि इतर अनेक शक्ती, ज्या आज जगभरातील असंख्य लोकांचे जीवन बदलत आहेत.
* एक अद्वितीय गुरु, जे योगाच्या चारही शाखा (कर्म, भक्ती, ज्ञान आणि ध्यान) शिकवतात. यामुळे अंतर योग जीवनशैलीशी सर्व साधक सहजपणे जोडले जातात.
* असीम क्षमतांना जागृत करणारे महान नेते.
* आचार्यजींच्या दिव्य उपस्थितीत असंख्य साधकांना भगवंताचे असीम सामर्थ्य, शुद्ध प्रेम आणि काल-भावनांच्या पलीकडील अवस्था अनुभवायला मिळते.
* केवळ आचार्यजींच्या दिव्य सान्निध्यात राहिल्याने, सर्व शंका दूर होतात आणि नकारात्मक गुण सकारात्मकतेत रूपांतरित होतात, असे लाखो साधकांनी अनुभवले आहे.
अंतर योग - अद्भुत परिवर्तनासाठी उत्प्रेरक
सर्व संत आणि गुरूंच्या उद्दिष्टांचे आणि दृष्टीकोनाचे ध्येय अंतर योगच्या माध्यमातून साकार होत आहे.
आमचे ध्येय:
* प्राचीन ग्रंथांचे कालातीत ज्ञान पुन्हा जिवंत करणे.
* प्राचीन वर्णव्यवस्थेची पुनर्स्थापना करून भारतातील नागरिकांना जातिव्यवस्थेच्या पलीकडे नेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम करणे.
* विश्व शांती आणि ऐक्य स्थापन करणे.
* गुरुकुल प्रणालीची पुनर्स्थापना करून, मूल्यांनी समृद्ध असे असामान्य नेते घडवणे आणि पारंपारिक गुरु-शिष्य आणि राजा-प्रजा परंपरा पुनर्जीवित करणे.
* चतुर, दृढनिश्चयी आणि शक्तिशाली तरुण पिढी घडवणे.
* वेदांताच्या ज्ञानाद्वारे महिलांना सशक्त बनवणे, ज्यामुळे त्या आत्मनिर्भर, स्वतंत्र आणि सहृदयी बनतील.
* नागरिकांना ब्रह्मचर्याचे मार्गदर्शन करणे
* भारतीयांच्या आरोग्यदायी आणि आनंदी जीवनासाठी प्राचीन सर्वसमावेशक आणि योगिक उपचार पद्धतींना पुनर्जीवित करणे आणि प्रसारित करणे.
* योगिक शेती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचे उत्पादन वाढेल.
* आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्यक्ती घडवणे, जे देशासाठी उच्च उद्दिष्ट साध्य करण्यास प्रयत्नशील आणि त्याग करण्यास सक्षम असतील.
* वन्यजीवांचे संवर्धन करणे, जे पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे.
अनेक आध्यात्मिक पुढारी आचार्य उपेंद्रजींना आपला आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की अंतर योग या क्रांतिकारी परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावेल.
सनातन धर्माची पुनर्स्थापना
* आचार्य उपेंद्रजींनी सनातन धर्माच्या प्राचीन, दुर्मिळ आणि अमूल्य ज्ञानाचे पुनर्जागरण करून ते भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा महान संकल्प केला आहे.
* आचार्यजी गेल्या २० वर्षांपासून अहोरात्र परिश्रम करून आपली प्राचीन ग्रंथसंपदा आणि तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
* आचार्य उपेंद्रजी अद्वैत वेदांताचे सर्वोच्च तत्त्वज्ञान इतर धर्मीय आणि आस्थाविश्वास असलेल्या साधकांना शिकवत आहेत, ज्यामुळे ते सनातन धर्माच्या मूलतत्त्वांशी जोडले जात आहेत.
* परिणामी, जगभरातील असंख्य लोक सनातन धर्म स्वीकारत आहेत आणि आपल्या धर्म, संस्कृती, परंपरा आणि पूर्वजांबद्दलचा अभिमान पुन्हा जागृत करीत आहेत.
* आचार्य उपेंद्रजींनी स्थापन केलेले अंतर योग गुरुकुलातील मंदिर हे सनातन धर्माचे प्रतीक आहे - जे सर्व धर्मांचा पाया आहे.
छायाचित्र: अंतर योग गुरुकुलातील मंदिर सनातन धर्माचा सार दर्शवते.
वर्णव्यवस्था पुनर्स्थापित करून भेदभावमुक्त समाजाची निर्मिती करणे
* आचार्यजी सर्व जातींतील लोकांना प्राचीन वर्णव्यवस्थेचे खरे अर्थ समजावून सांगत आहेत, त्यांना सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान प्रदान करत आहेत.
* लाखो लोक वर्णव्यवस्थेच्या तत्त्वांचे पालन करत आहेत, ज्यामुळे जातीय भेदभाव कमी होत आहे.
* आचार्यजी म्हणतात, “जेव्हा आपल्या शास्त्रांनुसार वर्णव्यवस्थेची पुनर्स्थापना होईल, तेव्हा जातिव्यवस्थेमुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्या देखील सुटतील.”
अगस्त्य नाडी ज्योतिष आणि इतर गुरु आचार्य उपेंद्रजींच्या दिव्य शक्तीला मान्यता देतात
* आचार्यजींकडे भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी एक अद्वितीय योजना आहे, असे अनेक आध्यात्मिक नेत्यांनी सांगितले आहे.
अगस्त्य महर्षी नाडी ज्योतिष भविष्यवाणी करते की आपल्या देशाच्या चमत्कारिक परिवर्तनामध्ये आचार्यजींची महत्त्वाची भूमिका असेल.
* नाडी ज्योतिषानुसार, आचार्य उपेंद्रजी हे स्वत: अगस्त्य महर्षींचे अवतार आहेत. पुढील काही वर्षांत, अनेक आध्यात्मिक संस्था आणि नेते आचार्यजींसोबत संयुक्तपणे कार्य करून राष्ट्राच्या पुनर्रचनेसाठी योगदान देतील.
* अनेक संतांनी आचार्य उपेंद्रजींच्या दिव्यता अनुभवली आहे आणि भारतासाठी त्यांच्या असामान्य कार्याचे कौतुक केले आहे.
अनेक आध्यात्मिक नेते आणि नाडी ज्योतिषांच्या वचनांनुसार, काही अद्वितीय कार्य फक्त आचार्यजींच्या नेतृत्वाखालीच पूर्ण होतील.
त्यामध्ये समाविष्ट आहे:
* भारताला विश्वगुरू आणि महासत्ता म्हणून परत प्रतिष्ठित करणे.
* चारही वर्णांना आध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून एकत्र करून जातीय भेदभावाचा अंत करणे.
* प्राचीन सनातन धर्माचे ज्ञान पुनर्जीवित करून ते प्रसारित करणे.
देशात क्रांतिकारी परिवर्तन घडवणारे एक क्रांतिकारी गुरु
* आचार्य उपेंद्रजी विविध गीता, उपनिषद, पुराण, वेद, उपवेद, अर्थशास्त्र, ब्रह्मसूत्र, नारद भक्तिसूत्र आणि इतर धर्मांचे ग्रंथ शिकवतात.
* आचार्यजी लुप्त झालेले प्राचीन ज्ञान पुनर्जीवित करत आहेत आणि गणेश विद्या, पितृ ऋण मुक्ती, श्रीविद्या, नवरात्र, संकल्प सिद्धी, ब्रह्मचर्य, शास्त्रोक्त दान, आहार, नवग्रह यांसारख्या अनेक विषयांवर अनन्य साधारण प्रवचन आयोजित करत आहेत.
* त्यांची अनेक प्रवचने इंटरनेटद्वारे (ऑनलाइन) आणि प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतींनी आयोजित केले जातात, ज्यामध्ये जगभरातील साधक दररोज दहा तासांपेक्षा अधिक तास, सलग पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस सहभागी होतात.
* लाखो साधक आचार्यजींच्या अप्रतिम वक्तृत्वकौशल्याने आणि विचारप्रवर्तक प्रवचनांनी प्रभावित होतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये तत्क्षणी सकारात्मक परिवर्तन होते.
भारताच्या नागरिकांना जन्मकुंडलीतील सर्वात मोठ्या दोषातून मुक्त करणे - पितृ दोष
* गेल्या १८ वर्षांपासून, आचार्य उपेंद्रजींनी पितरांच्या सामूहिक मुक्तीसाठी हे दिव्य कार्य केले आहे, जे आज जगात कोठेही केले जात नाही.
* सुमारे ९०% भारतीयांच्या जन्मकुंडलीत पितृ दोष / पितृ ऋण असते. या त्रासातून आपल्या देशातील नागरिकांना मुक्त करण्यासाठी, आचार्य उपेंद्रजी दरवर्षी पितृ पक्षात ‘अंतर योग पितृ ऋण मुक्ती शिबिर’ आयोजित करतात.
* हे शिबिर शक्तिशाली साधना आणि प्राचीन आध्यात्मिक ज्ञानाचे दुर्मिळ संयोजन आहे, जे तात्काळ पितरांची मुक्ती घडवते आणि लाखो साधकांना पितृ दोष आणि पितृ ऋण यापासून मुक्त करते.
* हे शिबिर अडथळे दूर करून साधकांना व्यवसाय, वैवाहिक जीवन, संतती, कायदेशीर प्रकरणे, आरोग्य यांसारख्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये प्रगतीसाठी मदत करते.
* यामुळे लाखो साधक आपले दैनंदिन चिंतेच्या पलीकडे जाऊन देश आणि जगाच्या सेवेसाठी उच्च उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
* अंतर योग पितृ ऋण मुक्ती शिबिर लाखो लोकांसाठी आयोजित करणे सामान्य गोष्ट नाही; हे फक्त दिव्य शक्तीनेच शक्य होऊ शकते.
* एवढेच नव्हे, आचार्य उपेंद्रजींकडे फक्त एका साधनेद्वारे काळ्या जादूच्या किंवा अमानवीय शक्तींच्या प्रभावातून संरक्षण आणि मुक्ती देण्याची अद्वितीय क्षमता आहे.
फ्री प्रेस जर्नल, एक अग्रगण्य वृत्तपत्रात, अंतर योग पितृ ऋण मुक्ती शिबिराच्या वैशिष्ट्यांवर एक लेख प्रकाशित केला आहे.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
https://tiny.cc/antaryog-prm-news
लहानपणापासून आचार्य उपेंद्रजींची कठोर तपश्चर्या आणि साधना
* आज अनेक साधक आचार्यजींच्या दिव्य तेज आणि प्रभामंडलाने भारावून जातात. हे सर्व त्यांच्या जीवनभरातील कठोर तपश्चर्यांचे फल आहे.
* आचार्यजींनी अन्न-पाणी न घेता सलग २४ तास महा मृत्युंजय मंत्राचा अत्यंत शक्तिशाली जप करून कठोर तपश्चर्या केली आहे.
* आचार्यजींनी गणेश मंत्राचा कोट्यधिक जप तसेच नवग्रह मंत्राचा लाखांधिक जप यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
* अविचल लक्ष्याने, आचार्यजींनी हनुमान चालीसा शंभरपेक्षा अधिक वेळा सलग जपली आहे, जी जगाच्या कल्याणासाठी समर्पित होती.
* त्याचप्रमाणे, आचार्यजींनी अनेक शक्तिशाली मंत्रांवर सखोल तपश्चर्या केली असून, विविध योगशक्ती प्राप्त केल्या आहेत.
अंतर योग महादान - शास्त्रानुसार असंख्य गरजूंची सेवा
* आचार्य उपेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली, अंतर योगद्वारे नियमितपणे ‘महादान’ या भव्य आणि व्यापक उपक्रमाचे आयोजन केले जाते.
* आचार्यजी दान करण्याची शास्त्रोक्त पद्धत साधकांना शिकवतात.
* या दानाच्या प्रक्रियेचे अनुसरण करून, साधक मागील जन्मातील कर्मबंधने दूर करतात आणि समृद्ध जीवन प्राप्त करतात.
* साधू-संत, ब्राह्मण, लहान मुलं, अनाथ, विशेष सक्षम व्यक्ती, विवाहित स्त्रिया, गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण या समाजाच्या नऊ वर्गांना निरपेक्ष प्रेमाने आणि एकात्मतेने अन्न व अन्य अत्यावश्यक वस्तू प्रदान केल्या जातात.
* आचार्य उपेंद्रजी म्हणतात, "जगाची रूची देणाऱ्यांमध्ये आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही; म्हणून दाता व्हा."
जगाच्या कल्याणासाठी आचार्य उपेंद्रजींनी रचलेली शक्तिशाली दुर्गा सप्तशती बीज मंत्र साधना
* दैवी तंत्रविद्येचे अभिज्ञ असलेल्या आचार्य उपेंद्रजींनी, अनेक वर्षांच्या ध्यान आणि तपश्चर्येने अनेक शक्तिशाली आणि प्रभावी साधना रचल्या आहेत. त्यापैकी एक प्रभावी साधना म्हणजे ‘अंतर योग श्री दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधना’.
* ७०० श्लोकांची ही शक्तिशाली साधना इतिहासातील सर्वात असामान्य रचनांपैकी एक आहे.
* जगभरातील हजारो साधक ही साधना करून सत्ता, संपत्ती आणि विवेक एकाचवेळी आकर्षित करत आहेत.
* तीन वर्षांच्या सलग आणि कठोर तपश्चर्येनंतर, आचार्य उपेंद्रजींनी या दिव्य साधनेच्या माध्यमातून योगशक्ती प्राप्त केल्या आहेत आणि आता निःस्वार्थ भावनेने जगभर पसरवत आहेत.
* आचार्य उपेंद्रजी सांगतात की, "आपल्या देशातील २% लोकसंख्येने जर ही साधना सामूहिक आणि नियमितपणे केली, तर महामारीसारख्या आपत्ती नष्ट होतील, गुन्हेगारी दर कमी होईल आणि देशात धार्मिक सलोखा निर्माण करून शांतता प्रस्थापित होईल."
* कोविड-१९ महामारीदरम्यान या साधनेच्या जपामुळे, असंख्य नागरिकांनी रोगाच्या परिणामांपासून बचाव करणारा एक संरक्षक कवच अनुभवला.
विशेष ज्ञान आणि साधना सत्रांद्वारे असंख्य साधकांमध्ये तात्काळ रूपांतरण घडवून आणणे
* आचार्य उपेंद्रजींचा दृढ विश्वास आहे की “याच क्षणी आणि याच ठिकाणी लाभ”.
लाखो साधकांनी आचार्यजींच्या विशेष ज्ञान आणि साधना सत्रांमध्ये त्वरित परिणामांचा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे.
* प्रवचने आणि कार्यक्रमांदरम्यान, असंख्य साधकांनी मनःशांती, चमत्कारिक उपचार, आध्यात्मिक प्रगती, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण, शत्रूंचे मित्रांमध्ये रूपांतर, आर्थिक प्रगती आणि इतर अनेक सकारात्मक बदलांचा अनुभव घेतला आहे.
* आचार्य उपेंद्रजी म्हणतात, "अंतर योगमध्ये चमत्कार घडत नसतील तर आश्चर्य वाटायला हवे. चमत्कार पाहून नम्र होऊ नका. जर तुम्ही भक्तिभावाने शरण गेलात तर चमत्कार तुमच्यापर्यंत आपोआप येतील."
म्हणूनच, अंतर योगमध्ये साधकांना सातत्याने चमत्कारांचा अनुभव येतो.
आपल्या देश भारत आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी मोफत सामूहिक ध्यान सत्रे
* गेल्या चार वर्षांपासून, अंतर योग ऑनलाइन ध्यान आणि जप सत्रांचे आयोजन करत आहे, जिथे जगभरातील लाखो साधक दररोज आचार्य उपेंद्रजींसोबत ध्यान करतात.
* जगाच्या कल्याणासाठी समर्पित, आचार्यजी नियमितपणे दुर्गा सप्तशती साधना, विश्व शांती साधना, शक्तिशाली महा मृत्युंजय मंत्र, गणेश मंत्र आणि इतर अनेक साधना सत्रांचे आयोजन करतात.
* या सत्रांना उपस्थित राहणाऱ्या साधकांनी मनःशांती, समृद्धी, जुनाट आजारांपासून बरे होणे, नकारात्मक गुणांवर मात करणे यासारखे अनेक अनुभव सादर केले आहेत. तसेच, त्यांनी वेदांताच्या ज्ञानामुळे आणि मोक्षाच्या जागृत इच्छेमुळे जीवनात सकारात्मक बदल अनुभवले आहेत.
* या सत्रांमुळे साधकांच्या कार्यक्षमता आणि उर्जेमध्येही वाढ झाली आहे.
२०२२-२३ मध्ये, आचार्यजींनी असंख्य साधकांसह महा मृत्युंजय मंत्राचा सव्वा तीन कोटी सामूहिक जप आणि सव्वा लाख वैयक्तिक जप पूर्ण केला
२०२२-२३ मध्ये, आचार्यजींनी असंख्य साधकांसह महा मृत्युंजय मंत्राचा सव्वा तीन कोटी सामूहिक जप आणि सव्वा लाख वैयक्तिक जप पूर्ण केला
भारताच्या सुवर्णयुगाची पुनर्स्थापना करण्यासाठी राष्ट्राच्या कणा असलेल्या तरुणांचे त्वरित रूपांतर
* आचार्यजी तरुणांच्या अंतर्गत क्षमतांना जागृत करून त्यांना राष्ट्राच्या कल्याणासाठी सक्षम करत आहेत.
* ब्रेन ड्रेनच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी, आचार्यजी तरुणांमध्ये देशभक्तीची भावना रुजवून त्यांना उच्च उद्दिष्टांसाठी प्रोत्साहित करत आहेत..
* आचार्यजी प्रत्येक नागरिकामध्ये सनातन धर्माचे गहन तत्त्वज्ञान रुजवत आहेत, ज्यामुळे त्यांच्यामधे सर्व धार्मिक अडथळ्यांच्या पलीकडे जाण्याची मानसिकता विकसित होत आहे. यामुळे लाखो नागरिकांमध्ये देशाविषयी खरी प्रेमभावना जागृत होत आहे.
* आचार्यजींचे तरुण, ऊर्जा संपन्न आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांना तरुण पिढीसाठी आदर्श प्रेरणास्थान बनवते.
आपल्या देशासाठी द्रष्टे नेते निर्माण करण्यासाठी गणेश कोटी मूळ मंत्र जप यज्ञाचा भव्य संकल्प
* जानेवारी २०२४ पासून, आचार्य उपेंद्रजी गणेश कोटी मूळ मंत्र जप यज्ञाचे सत्र आयोजित करत आहेत, ज्यामध्ये किमान आठ कोटींपेक्षा अधिक सामूहिक गणेश मूळ मंत्र जप आणि दोन लाखांपेक्षा अधिक वैयक्तिक जपांचा दिव्य महासंकल्प आहे.
* ही साधना बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, विवेकशक्ती सुधारण्यासाठी, नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
* सामूहिक तपश्चर्या आपल्या देशातील नागरिकांसाठी एक संरक्षक कवच निर्माण करत आहे, जे आव्हानात्मक काळात सात्विक व्यक्तींचे रक्षण करते.
आपल्या भारत देशासाठी असामान्य नेते निर्माण करणे
* आजच्या काळात, भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी दृढ इच्छाशक्तीचे शक्तिशाली नेते आणि नागरिक घडवण्याची तीव्र गरज आहे.
* आचार्यजी व्यापार, राजकारण आणि आध्यात्मिक क्षेत्रात द्रष्टे नेते घडवत आहेत, जे राष्ट्राच्या समग्र विकासासाठी समर्पित आहेत आणि आपले जीवन मजबूत आध्यात्मिक मूल्यांवर आधारित ठेवतात.
* आचार्यजींचे प्रभावी ज्ञान सत्र आणि साधना सत्र नागरिकांना राष्ट्रासाठी निःस्वार्थ सेवा करण्यासाठी आणि उच्च नैतिक मूल्य जपण्यासाठी प्रेरित करत आहेत.
ब्रह्मचर्याच्या ज्ञानाने आपल्या देशातील नागरिकांचे रूपांतर
* आचार्य उपेंद्रजी सर्व वयोगटांतील व्यक्तींना ब्रह्मचर्य या महत्त्वपूर्ण तत्त्वाचे शिक्षण देतात, जे वैज्ञानिक आधार आणि सोप्या वास्तव जीवनातील उदाहरणांसह मांडले जाते, त्यामुळे त्वरित रूपांतर घडते.
* आजच्या समाजात, अनैतिक संबंध, लिव्ह-इन रिलेशनशिप्स, बहुपत्नीत्व आणि समलैंगिक विवाह यांसारख्या समस्या सामान्य होत आहेत, ज्या आपल्या राष्ट्राच्या यशासाठी मोठा अडथळा निर्माण करत आहेत.
* आचार्यजींच्या शिक्षणामुळे ब्रह्मचर्याबद्दलचे गैरसमज दूर होत आहेत, विशेषतः तरुणांमध्ये.
* यामुळे तरुण पिढी अनैतिक संबंध मागे टाकून सद्गुणी जीवन जगायला शिकत आहे आणि नैतिकदृष्ट्या शुद्ध जीवन जगत आहे.
शतकानुशतके दडपशाहीत राहिलेल्या महिलांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करणे
* आचार्य उपेंद्रजी नियमितपणे महिलांसाठी वेदांताचा मार्ग स्पष्ट करणारी प्रवचने आयोजित करतात, ज्यामुळे त्या सशक्त, आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि दयाळू व्यक्ती होण्यासाठी प्रेरित होतात.
* आचार्यजींच्या अनन्य शिक्षणशैलीमुळे, आजच्या आधुनिक महिलांनाही प्राचीन आध्यात्मिक ज्ञान प्रेरणादायी वाटते.
* अंतर योगच्या संस्थापिका, गुरुमाता नीता ताई आणि रूपा ताई, महिलांसाठी आदर्श प्रेरणास्थान आहेत आणि महिलांना सशक्त बनवून त्यांचं जीवन बदलत आहेत.
* भारताच्या समग्र प्रगतीसाठी, अंतर योग देशभरातील महिलांना सशक्त करण्यासाठी अमूल्य योगदान देत आहे.
भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवणे
* आज, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब अधिक गरीब होत आहेत. आचार्यजी गेल्या २० वर्षांपासून घराघरात श्रीविद्या ज्ञान पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांना तात्काळ यश आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे.
* श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत असली, तरी आचार्यजींच्या अद्वितीय शिक्षणांनी आणि लाखो साधकांना दिलेल्या श्रीविद्या दीक्षेमुळे ही दरी कमी होत आहे.
* भारताच्या सुवर्ण गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या आचार्यजींच्या संकल्पामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठा हातभार लागत आहे.
* आचार्यजी अर्थशास्त्र, आधुनिक गुंतवणूक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचे शिक्षण देत आहेत, ज्यामुळे नागरिक समृद्धी आकर्षित करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकतात.
भारताच्या प्रगतीचा कणा - शेतकरी सक्षमीकरण
* आचार्य उपेंद्रजींनी एक अद्वितीय योगिक शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे पिकाचे उत्पादन २ ते ८ पट वाढते.
* या नवकल्पनेची क्षमता पिकाचे उत्पादन सुधारण्यात मोठी भूमिका बजावते, शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करते आणि त्यामुळे देशाला भेडसावणारी शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या दूर होऊ शकते.
* हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आनंदी, तणावरहित आणि समृद्ध बनवते, ज्यामुळे ते सात्विक वृत्तीने पिके घेतात.
* सात्त्विक, सेंद्रिय आणि शुद्ध उत्पादने नागरिकांना आरोग्यदायी आणि रोगमुक्त जीवन जगण्यास मदत करतील.
विज्ञान आणि आध्यात्म यांचा समन्वय साधून अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे
* भगवद्गीतेनुसार, श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आध्यात्मिक ज्ञान हे विज्ञान आणि तर्काच्या आधारे शिकवले पाहिजे.
* आपले पूज्य ऋषी-मुनी आणि संत हे महान वैज्ञानिक होते, ज्यांनी वैज्ञानिक ज्ञान व्यावहारिक दृष्टिकोनातून शिकवले.
* आचार्यजी आपल्या धर्मग्रंथांमागील विज्ञान इतर धर्मीय अनुयायांना समजावून सांगतात. त्यामुळे सर्व धर्मीय अनुयायांमध्ये समाधानाची भावना निर्माण होते.
* आचार्य उपेंद्रजींची ही क्रांतिकारक शिक्षण पद्धती बुद्धिजीवी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले लोक, तसेच विविध विचारसरणी आणि धर्मांचे साधक यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात प्रगती करण्यास मदत करते.
* आचार्यजी सहजतेने सर्व वयोगट, लिंग, व्यवसाय, धर्म आणि श्रद्धा असलेल्या लोकांशी जोडले जातात.
स्वास्थ्यदायी आणि समृद्ध भारतासाठी समग्र उपचारांचा प्रचार
* आचार्यजी प्राचीन तंत्रे आणि आधुनिक उपचार पद्धतींचा समावेश करून ‘साईन्स ऑफ हीलिंग’ सारख्या विशेष सत्रांच्या माध्यमातून स्वास्थ्यदायी आणि समृद्ध भारतासाठी समग्र उपचारांचा प्रचार करतात.
* या सत्रांमध्ये सहभागी होणारे साधक असाध्य रोगांपासून त्वरित आणि कायमस्वरूपी बरे होतात आणि त्यांच्या रोगांच्या मूळ कारणांबद्दल आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतात.
* लाखो साधक कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयरोग, थायरॉइड, मधुमेह यांसारख्या आजारांपासून पूर्णपणे बरे झाले आहेत, तसेच फ्रोझन शोल्डर, सर्दी-खोकला यांसारख्या सामान्य व्याधींवरही मात केली आहे.
* या सत्रांमुळे साधकांना त्यांच्या आरोग्य, संपत्ती, व्यवसाय, नातेसंबंध आणि इतर समस्यांवर त्वरित उपाय सापडतात.
* ‘साईन्स ऑफ हीलिंग’ सत्रांमध्ये लाखो सहभागी अनुभवणाऱ्या ‘आत्ता आणि इथे’ परिणामांमागचे गुपित म्हणजे आचार्यजींची दिव्य उपचारशक्ती.
आमच्या साधकांचे शक्तिशाली उपचार अनुभव आमच्या यूट्यूब वाहिनीवर पहा:
https://youtube.com/@AntarYogFoundationOfficial
आचार्य उपेंद्रजी - एक द्रष्टे नेते, भारताचे सुवर्णयुग परत आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील
* आचार्यजी राष्ट्राचे दीपस्तंभ असून, संकटांच्या सामन्यात धैर्याने उभे राहण्यासाठी लाखो लोकांना प्रेरित करत आहेत.
* अंतर योग दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधनेची रचना केली आहे.
* लाखो साधकांना आत्मशांती प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील उच्च उद्दिष्टांकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
* आचार्यजींनी गणेश विद्या, संकल्प सिद्धी, पितृ ऋण मुक्ती, आत्म उपचार तंत्र, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, चाणक्य नीति, विविध उपनिषदे, अनेक पुराणे आणि विविध गीता अशा प्राचीन ग्रंथांचे पुनरुज्जीवन केले आहे.
* आचार्यजींच निष्ठावान देशप्रेम वय, धर्म आणि आर्थिक स्थितीच्या अडथळ्यांच्या पलीकडे आहे आणि लाखो नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना पुन्हा जागृत करत आहे.
* आमच्या राष्ट्राच्या युवा पिढीला भविष्यातील नेते बनण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
* आचार्यजींचे विचारप्रवर्तक प्रवचने साधकांना दीर्घकाळ गुंतवून ठेवतात, ज्यामुळे त्यांच्यात त्वरित सकारात्मक बदल होतात.
* आचार्यजी आध्यात्मिक शिक्षण परस्पर संवादात्मक पद्धतीने आणि सोप्या उदाहरणांद्वारे शिकवतात, ज्यामुळे सर्व वयोगटातील साधक वेदांताचे आनंदाने शिक्षण घेतात.
* लाखो नागरिकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी देशभक्तीचे महत्त्व समजावून सांगत आहेत.
* यथाशक्ती दक्षिणेच्या तत्त्वावर दीर्घ कालावधीचे शिबिरे निःस्वार्थपणे आयोजित करतात, मानवजातीच्या उन्नतीसाठी प्रखर इच्छाशक्तीने कार्यरत आहेत.
* आचार्यजींचे कार्य त्यांच्या महान मनःशक्ती आणि नम्रतेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
* तरुण, वैज्ञानिक, धार्मिक किंवा नास्तिक समुदायांना नर ते नारायण प्रवासात प्रगती करण्यासाठी मदत करत आहेत.
* आचार्यजींचे जीवन शुद्ध प्रेम, ज्ञान आणि कर्मयोगाचे साक्षात प्रमाण आहे.
अंतर योग - भारताच्या अद्भुत परिवर्तनाचे केंद्र
मुंबई शहराच्या मध्यभागी एक अत्याधुनिक गुरुकुल.
अंतर योग गुरुकुलाच्या बांधकामादरम्यान पवित्र यंत्रांची स्थापना करण्यासाठी शक्तिशाली यज्ञ करताना
अंतर योग सेवा संघ भारत देशासाठी सेवा करण्यास समर्पित आहे
आचार्य उपेंद्रजींच्या आध्यात्मिक जागृती करणाऱ्या प्रवचनांमध्ये मंत्रमुग्ध अंतर योग साधक
अंतर योग गुरुकुल
पत्ता : दुसरा मजला, केमको हाऊस, डी. सुखदवाला रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१
ईमेल : [email protected]
दूरध्वनी : +९१ ७७१०९ ४८४६१
यूट्यूब : Antar Yog Foundation Official
टेलिग्राम : https://bit.ly/antaryogfoundation
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/antaryogfoundation